" भविष्याच्या अंतरंगात !!
-
.



सुस्वागतम ! 'भविष्याच्या अंतरंगात' या टॅरो कार्ड द्वारे भविष्याची माहिती देणार्‍या ब्लॉग मधे आपल्या सर्वांचे हार्दीक स्वागत आहे !! आपल्याला यातील माहिती/ब्लॉग आवडला का ते अवश्य कळवा.



२६ / ११ च्या मुंबईवरील ह्ल्ल्याला एक वर्ष होत आहे. त्यानिमित्याने आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या सर्वांना 'मानाचा मुजरा !! FLICKERING CANDAL Pictures, Images and Photos या हल्यातील आरोपींना लवकरात लवकर देहदंड देण्याची सुबुध्दी परमेश्वर सरकाराला देवो अशी परमेश्वरास प्रार्थना!

भविष्य शास्त्रावर तुमचा विश्वास आहे का?

Thursday 26 November 2009

अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन






श्री दत्त ज्योतिष विद्यालय, मुंबई यांच्या विद्यमाने दादर येथे रविवार दि. २४ जानेवारी २०१० रोजी ' ज्योतिष -अध्यात्म व साधना ' या विषयावर एक दिवसाचे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन आयोजित करण्यात येत आहे। सदर अधिवेशनामध्ये खालील मान्यवरांची विविध विषयांवर व्याख्याने होणार आहेत.

१) रामायण व महाभारतकालीन ग्रहस्थिती - डॉ. प. वि. वर्तक
२) ज्योतिष व साधना - विद्या वाचस्पती, श्री. आदिनाथ साळवी
३) कर्म सिध्दांत व नियतीचे संकेत - श्री. विजय हजारी
४) ज्योतिष व अंधश्रध्दा निर्मुलन - श्री. संजय उपाध्ये ( प्रवचनकार )


तसेच याप्रसंगी श्री.विजय हजारी लिखित , 'भाव नवमांश रहस्य' या महान ग्रंथाच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे।

या अधिवेशनासाठी प्रवेश फी रु. ३५०/- आहे. इच्छुकांनी या रकमेचा चेक / डी.डी V. D. HAJARI यांच्या नावाने १० डिसेंबर पुर्वी मिळेल अशा बेताने खालील पत्त्यावर पाठवावा.
V. D. HAJARI
FLAT NO 403, GOD'S GIFT 'A' WING CO-OP. HSG. SOCIETY,
N.M.JOSHI MARG, ( NEAR MATHURDAS MILL COMPOUND ),
LOWER PAREL ( WEST ) , MUMBAI - 400013

अधिक माहितीसाठी श्री वरदविनायक यांच्याशी ९८२०५३०११३ या नंबरावर संपर्क साधू शकता।


धन्यवाद
अमोल केळकर







Wednesday 11 November 2009

विश फॉर्म्यूला

मॅजीशीयन हे टॅरो कार्ड मधील एक महत्त्वाचे कार्ड आहे. मॅजीशीअन म्हणजे जादुगार. जादुगार आपल्या कृतीने / क्लूप्तीने आश्चर्य कारक गोष्टी करुन दाखवतो जी सर्वसामान्य माणसे करु शकत नाहीत.
हे कार्ड जेंव्हा रिडिंग मधे येते तेंव्हा काही आश्चर्यकारक गोष्टी घडवून आणण्याची क्षमता आपल्यात आहे असे दर्शवले जाते. खालील एक विश फॉर्म्यूला (WISH ) लक्षात घेण्या सारखा आहे.
W - ( Will Power ) - इच्छा शक्ती
I - Information - माहिती
S - Set Purpose - ध्येय निश्चिती
H - Hard work - कष्ट चेण्याची तयारी




वरील विश फॉर्म्यूला वापरुन आपल्यातील जादुगार कुठलीही अशक्य गोष्ट पुर्णत्वास नेतो.

Tuesday 10 November 2009

यंदा कर्तव्य नाही


स्टार माझा या वाहिनीचा लग्नाच्या मुहुर्तांसंबंधीचा हा व्हिडीओ। यात असे म्हणले आहे की या वर्षी लग्नाचे फक्त ४१ मुहुर्त आहेत. गुरु शुक्र अस्त तसेच अधिक मास यामुळे असे आहे. अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.

video

Friday 6 November 2009

सचिन अभिनंदन !


एकदिवशीय क्रिकेटमधे १७,००० धावांचा टप्पा पार केल्याबद्दल लादक्या सचिनचे अभिनंदन. आपला आवडता प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया विरुध्द त्याने ही कामगिरी केली आहे. भारतीय संघाचा विजय झाला असता तर आणखी आनंद झाला असता.


सचिनला त्याचा पुढील वाटचालिस अनेक शुभेच्छा !



Thursday 15 October 2009

धन्वंतरी आणी टेंम्परन्स टॅरो कार्ड

धन्वंतरी हा देवांचा वैद्य आहे. समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृताचा कुंभ घेऊन आला होता. आज धनत्रयोदशी या दिवशी धन्वंतरीची पुजा केली जाते।

टॅरो डेक मधे ही टेम्परन्स हे मेजर कार्ड आरोग्याशी संबंधीत आहे. आजारी व्यक्तीच्या संबंधीत हे कार्ड रिडींग मधे आल्यास आजारात सुधारणा होणे दर्शवते. तसेच समतोलपणा राखणे हे ही या कार्डाचे वैशिष्ठ आहे.










आपणास दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

अमोल केळकर

Saturday 3 October 2009

नवीन युती / दोस्ताना

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्याने सध्या सर्वत्र चांगलेच वातावरण तापले आहे.. सर्वच पक्षात बंडखोरी झाली आहे. जुने शत्रू आता मित्र झाले आहेत. नवनवीन आघाड्या / युत्या केल्या जात आहेत. बेरजे बरोबरच वजाबाकीचे ही राजकारण सुरु झाले आहे.
या सर्व गोष्टींशी संबंधीत टॅरो डेक मधील ३ ऑफ कप हे कार्ड आहे. नवीन दोस्ती करणे/ जुळणे. नवीन ओळख वाढवणे, समारंभ इ. गोष्टी हे कार्ड दर्शवते।

Friday 25 September 2009

व्हॉटस युवर राशी ?

व्हॉटस युवर राशी ? आप की राशी क्या है?




माणसाने कितीही म्हणले की माझा भविष्यावर विश्वास नाही तरीही पुढे घडणार्‍या घटनांबाबत माणसाला उत्सुकता ही असतेच. मजा म्हणुन का होईना माणुस भविष्य पाहतोच. भविष्यविषयाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहतो।



श्री. शरद उपाध्दे यांच्या 'राशीचक्र' या कार्यक्रमाला अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला. यातील प्रत्तेक राशीची वैशीष्ठे सांगून, मजेशीर उदाहरणे देऊन उपाध्दे साहेब प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाले. आपल्या राशी बद्दल काय काय रोचक माहिती सांगितली जात आहे किंवा आपल्या राशीची काय गुण्/अवगुण आहेत हे पाहण्यासाठी सर्वच राशीचे लोक कार्यक्रमाला उपस्थित राहू लागले आणि कार्यक्रम यशस्वी झाला.
सध्या हिंदीत ही अशीच एक थीम घेऊन एक सिनेमा येत आहे ' व्हॉटस युवर राशी ? '. अर्थात राशीचक्रा प्रमाणे हा सिनेमा देखील चांगला चालेल हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची गरज आहे का ?



टॅरो कार्ड मधे देखील प्रत्तेक १२ राशी दर्शवणारी १२ कार्डे आहेत. ती खालील प्रमाणे. त्या प्रत्तेक कार्डाचे गुण/ माहिती त्या त्या राशील अगदी योग्य प्रकारे लागू होते.

मेष ----------वृषभ------------ मिथून







कर्क ------------सिंह -----------कन्या




तुळ------------- वृश्चिक ------------धनु




मकर ------------कुंभ -----------मीन

Tuesday 8 September 2009

सांगली / मिरजेतील जातीय दंगल -

सध्या सांगली आणि मिरज परिसरात राजकीय हेतूने प्रेरीत दंगा चालू आहे. सगळे राक्षस एकमेकांचे नुकसान करण्यात गुंतले आहेत जणू काही डेवीलच यांच्यात संचारला आहे.

टॅरो कार्ड मधील डेव्हील हे कार्ड हे सर्व स्पष्ट करते।

सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि सर्वच राजकीय पक्षांच्या सहकार्याने हा अशांततेचा डेव्हील लवकरात लवकर नष्ट होऊ दे हीच प्रार्थना


जय भवानी ! जय शिवाजी !!


Monday 7 September 2009

श्री. भाऊसाहेब पडसलगीकर यांचे निधन

सांगलीतील जेष्ठ बुध्दीबळ प्रशिक्षक श्री भाऊसाहेब पडसलगीकर यांचे आज दु:खद निधन झाले।
त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली।

देशातील अनेक उत्तोमत्तम बुध्दीपळपटू बनवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
सांगलीतील नुतन बुध्दीबळा तर्फॅ आयोजीन करण्यात येणारी बुध्दीबळ स्पर्धा थोड्याच कालावधीत देशातील एक नामांकीत स्पर्धा म्हणून ओळखली जाऊ लागली। अनेक नामांकीत खेळाडू या स्पर्धेत हजेरी लावत असत.


अत्यंत शिस्तप्रिय, निर्व्यसनी, कुशल संघटक व प्रशिक्षक असणारे भाऊसाहेब पडसलगीकर हे सांगलीचे एक मोलाचे भूषण होते.




'भविष्याच्या अंतरंगात' भेट दिल्याबद्दल अनेक धन्यवाद

amol_kelkar Made with My Cool Signs.Net
गंमत गाणी इथे वाचा